Sunetra Pawar News | पवार कुटुंबिय पुन्हा एकत्र येणार? सुनेत्रा पवारांचं मोठं वक्तव्य..

"आमचे कौटुंबिक संबंध चांगले होऊ शकतात.." असं मोठं वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केलंय. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली. पवार कुटुंबिय एकमेकांविरोध उभे ठाकले. बारामतीत नंनद विरुद्ध भावजय असा सामना लोकसभा निवडणुकीत रंगला. यावरुन अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कित्येकदा शाब्दीक वार-पलटवार झालेत. पण, राजकारणामुळे बिघडलेले हे संबंध निवडणुकीतनंतर सुधारु शकतात. असा आशावाद बारामती लोकसभा मतदासंघाच्या महायुतीच्या उमेदवार सनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. सुनेत्रा पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आलंय. एकमेकांना टोकाचा राजकीय विरोध करणारे पवार कुटुंबिय खरचं एकत्र येतील का? असा प्रश्नही या निमित्ताने अनेकांना पडला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com