Baramati Lok Sabha News | Supriya Sule आणि Sunetra Pawar यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नोटीस, कारण काय?

सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक खर्चावर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी 28 एप्रिलपर्यंत 37 लाख 23 हजार इतका खर्च केल्याचे दाखवले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. पण सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. निवडणूक खर्चावर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांनी 28 एप्रिलपर्यंत 37 लाख 23 हजार इतका खर्च केल्याचे दाखवले आहे. पण आयोगाने रजिस्टर तपासल्यानंतर खर्चात 1 लाख 3 हजार रुपयांची तफावत आढळली आहे. तर सुनेत्रा पवार यांच्या खर्चात 9 लाख 93 हजार इतकी तफावत आढळली आहे. आयोगाने दोन्ही उमेदवारांनी यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com