Sugar Stock : साखर दर नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय, व्यापार्‍यांवर घातले निर्बंध, आता इतकाच साठा ठेवता येणार

Sugar price control, Sugar stock limit : सणासुदीच्या काळात साखरेचा तुटवडा टाळण्यासाठी आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने १ ऑगस्टपासून साखर व्यापाऱ्यांसाठी नवीन साठा मर्यादा लागू केली आहे.

Sugar Price Control Latest News : सणासुधीच्या काळात साखरेचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवे निर्बंध लागू केले आहेत. १ ऑगस्टपासून कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तसेच एका वेळी ४,००० क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा ठेवता येणार नाही.

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने 'अत्यावश्यक वस्तू कायद्या'अंतर्गत हे आदेश जारी केले आहेत. व्यापाऱ्यांना आपल्याकडील साखरेच्या साठ्याची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नियमितपणे अपडेट (अद्ययावत) ठेवावी लागणार आहे. हे निर्बंध ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत कायम राहणार आहेत.

सणासुदीच्या काळात संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी आणि साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखर व्यापाऱ्यांवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार 1 ऑगस्टपासून कोणत्याही व्यापाऱ्याला 30 दिवसांपेक्षा अधिक काळ तसंच एकावेळी 4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा करता येणार नाही. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयानं अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत हे आदेश जारी केले असून, व्यापाऱ्यांना आपल्या साठ्याची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अद्ययावत ठेवावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com