८३ वर्षांची परंपरा कायम; श्रीमंत मानाचा कसबा गणपती शेतकऱ्यांचा राजा म्हणून आजही अग्रस्थानी|VIDEO

Kasba Ganpati Established In 1943: सोलापूरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपती ८३ वर्षांची परंपरा कायम ठेवत आजही शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. लेझीम, बैलजोडी, दांडपट्टा आणि पारंपरिक मिरवणुकीने गणेशोत्सवात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Summary

श्रीमंत मानाचा कसबा गणपती यंदा ८३ व्या वर्षी भव्य मिरवणूक काढली.

३०० हून अधिक लेझीमपटूंनी आकर्षक डाव सादर केले.

बैलजोडी, दांडपट्टा व कार्टून बाहुल्यांनी मिरवणुकीत रंगत आणली.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी १९४३ साली सुरू केलेल्या या परंपरेला आजही कायम ठेवले आहे.

सोलापूरात गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत असून,८३ व्या वर्षी श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीची वाजत गाजत पारंपरिक लेझीमची भव्य मिरवणूक काढण्यात आलीय. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून १९४३ साली कसबा भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्थापन केलेल्या या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही कायम आहे. गणेश चतुर्थीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत ३०० हून अधिक लेझीमपटूंनी पांढऱ्या शुभ्र वेशभूषेत नेत्रदीपक डाव सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

बैलजोडी, दांडपट्टा तसेच विविध कार्टूनच्या बाहुल्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरलेत. चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरुवात झालेली ही मिरवणूक नविपेठ, दत्त चौक, बाळी वेस मार्गे उत्तर कसबा येथे पोहोचली असून तेथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. श्रीमंत मानाचा कसबा गणपती आजही शेतकऱ्यांचा राजा म्हणून सोलापूरकरांच्या श्रद्धेचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com