फेसबुक, इंस्टाग्राम वापरण्यासाठी पैसे लागणार? मेटा कॉम्बो ऑफर लाँच करणार? | VIDEO

Facebook and Instagram Combo Offer : मेटा जाहिरातमुक्त अनुभवाच्या हेतूने दर महिन्याला जवळपास १,१९० आकारण्याची योजना आखत आहेत. जाहिरातींसह सर्फिंगचा अनुभव घेणाऱ्यांसाठी ही रक्कम इथे लागू नसेल.

सोशल मीडियाच्या उपलब्धतेनंतर सारं जग एका वेगळ्या पद्धतीनं एकमेकांची जोडलं गेलं असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावरील माणसाची माहिती याच सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी सहजपणे मिळू लागली. मात्र, आता येत्या काळात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर हे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी युजर्सकडून काही शुल्क आकारण्याचं धोरण राबवण्यात येऊ शकतं. मेटानं घेतलेल्या या निर्णयानंतर अनेक युजर्सच्या चिंतेत भर पडली असून, मिळालेल्या माहितीनुसार, मेटा जाहिरातमुक्त अनुभवाच्या हेतूने दर महिन्याला जवळपास १,१९० आकारण्याची योजना आखत आहेत. जाहिरातींसह सर्फिंगचा अनुभव घेणाऱ्यांसाठी ही रक्कम इथे लागू नसेल. अधिकृत माहितीनुसार, मेटा एक कॉम्बो ऑफरही लाँच करणार असून, यामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचं ॲड फ्री वर्जनसुद्धा उपलब्ध असेल. ही सुविधा फक्त डेस्कटॉप युजर्ससाठी लागू असेल असंही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com