Operation Tiger: बंडखोर खासदारांचं सदस्यत्व रद्द होणार?; ठाकरेंनी टाकला कायद्याचा डाव

Shiv Sena ubt issues notices to rebel mps amid operation tiger row : ठाकरेसेनेतील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत यांनी संबंधित खासदारांच्या सदस्यत्वाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ६ खासदार फुटले. ते सर्व वेगळा गट स्थापन करून नंतर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या किती खासदारांनी बंड केलं, नेमके किती फुटले, ठाकरे गटात नक्की फूट पडली का? अशा प्रश्नार्थक चर्चा काल दिवसभर होत्या. त्याचा सोक्षमोक्ष आज ठाकरेंच्या शिवसेनेने बोलावलेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर लागणार होता. या बैठकीला किती खासदार उपस्थित राहतात, यावरून शिवसेना फुटली का, हे स्पष्ट होणार होते. लोकसभेतील पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी खासदारांनी बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्हीप बजावला होता.

या बैठकीला फक्त तीन खासदार उपस्थित राहिले. अनिल देसाई, अरविंद सावंत आणि वाजे हे तिघेच या बैठकीला होते. उर्वरित खासदार अनुपस्थित राहिले. त्यामुळे आता ठाकरे गटाने शेवटचं अस्त्र बाहेर काढलं आहे. बंडखोर खासदारांना ठाकरे सेनेकडून नोटिस बजावण्यात येणार आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला आहे. बैठकीला व्हीप झुगारल्यानं या नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या खासदारांवर कायदेशीर कारवाई होईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com