Share Market Today: तिकडे युद्ध थांबलं, इकडे शेअर मार्केटमध्ये तेजी; सेन्सेक्स २७०० अंकांनी वधारला | VIDEO

Share Market Sensex Rise: इराण-अमेरिका युद्धाला पूर्णविराम मिळाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

इराण-इस्त्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळाला आहे. दोन आठवड्यांसाठी युद्धाला पूर्णविराम देण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. जागतिक पातळीवर युद्ध थांबलं, त्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. शेअर मार्केटमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. सकाळी शेअर मार्केट उघडताच सेन्सेक्स २७०० अंकांनी वधारला आहे. निफ्टीमध्येही ८०० अंकांची विक्रमी झेप पाहायला मिळाली. अमेरिका इराण सीजफायरचा हा सकारात्म परिणाम झाला आहे.सेन्सेक्स ७७ हजार पार गेला होता.यामुळे गुंतवणूकदारांनाही दिलासा मिळाला आहे. युद्ध सुरु झाल्यापासून शेअर मार्केटमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आज शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com