Sharad Pawar: शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार? राष्ट्रवादीत ३७ मतांचा मोठा पेच | VIDEO

Sharad Pawar On Rajya Sabha: शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर निवडून येणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. शरद पवारांचा कार्यकाळ २ एप्रिलला संपणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना संधी मिळणार का असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा राज्यसभेवर निवडून येणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. २ एप्रिल रोजी शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी किमान 37 आमदारांच्या मतांची गरज असते. मात्र, सध्या राष्ट्रवादीकडे अवघे 10 आमदार असल्याने ही लढत आव्हानात्मक ठरू शकते. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे सुमारे 50 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे MVA कडून एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. म्हणूनच आता महाविकास आघाडी शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी देणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com