Sharad Pawar Amravati Speech | माफी मागितली, चूक झाली म्हणाले...नेमकं काय म्हणाले शरद पवार?

"गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहता माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी अमरावतीत जावं आणि सांगावं की आमच्याकडून चूक झाली आणि ती चूक पुन्हा होणार नाही."

Sharad Pawar Amravati Speech | अमरावतीत लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी मविआची सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी चक्क अमरावतीकरांची माफी मागितली. "मला अमवरवतीकरांची माफी मागायची आहे. माझ्याकडून एक चूक झाली. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक होती त्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार बनवलं. गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहता माझ्या मनात अस्वस्थता होती की कधीतरी अमरावतीत जावं आणि सांगावं की आमच्याकडून चूक झाली आणि ती चूक पुन्हा होणार नाही. ही चूक दुरुस्त करायची आहे, त्यासाठी ज्याचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन शेवटच्या माणसाचा विचार करणारं आहे अशा बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथे आलोय" असं शरद पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com