Sharad Pawar : डॉक्टरांच्या सल्ल्याने शरद पवारांचे चार दिवसांचे दौरे रद्द | Video

Sharad Pawar Health Issue : शरद पवार यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलेला असल्याने त्यांचे पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आलेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा पुढच्या चार दिवसांचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शरद पवार पुढील चार दिवस आराम करणार आहेत. सततची धावपळ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी शरद पवार यांना दिला आहे. सध्या शरद पवार यांचा घसा दुखत असून सर्दी पडश्याचा त्यांना त्रास होत आहे. शरद पवार सध्या पुण्यात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

घसा तसंच सर्दीचा त्रास होत असल्याने शरद पवार यांना डॉक्टरांनी चार दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देत धावपळ न करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे शरद पवार यांचे पुढच्या चार दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. काल पवार कोल्हापूरला होते. त्यानंतर त्यांचा कराडचा दौरा होता. गेल्या काही दिवसांपासून ते सतत दौऱ्यावर आहेत. सोमवार, मंगळवार शरद पवार विदर्भ दौऱ्यावर जाणार होते. मात्र वातावरणातील बदलामुळे शरद पवार यांच्या तब्येतीवर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिल असल्याने पुढच्या चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द केल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com