Beed Crime: सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरी वनविभागाचा छापा

Forest Department Raids Satish Bhosale’s House: सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचे एकेक कारनामे समोर आल्यानंतर आता बीडमधील अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बीड येथील शिरूर तालुक्यात सतीश भोसले उर्फ खोक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वनविभाग अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.आज सतीश भोसलेच्या घरी वनविभागाने धाड टाकली. यामध्ये वनविभागाला प्राण्यांचे मास आढळून आले आहे. हरिण, काळवीट आणि मोर पकडण्यासाठी लावण्यात येणाऱ्या जाळ्या त्याच्या घरी सापडल्या आहेत. खोक्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहे. या खोक्या भोसलेच्या घरी मोठी झाडाझडती सुरू आहे.

एका व्यक्तीला अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आल्याननंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर मारहाण करणार व्यक्ती हा सतीश भोसले उर्फ खोक्या असल्याचे पोलीस तपासातून समोर आले. त्यानंतर खोक्यांचे एकेक काळे कारनामे समोर येऊ लागले आहे. तसेच वनविभागाच्या छाप्यामध्ये त्याच्या घरी अनेक घबाड सापडलंं असून वनमंत्री गणेश नाईक यांनी देखील खोक्यावर कडक शासन करा असे निर्देश वनअधिकाऱ्यांना दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com