सातारा ZP अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या दिवशी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर|VIDEO

Satara ZP President Election CCTV Turned Off: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र समोर आले. मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी पोलिसांच्या धक्काबुक्कीवर नाराजी व्यक्त केली.

ओंकार कदम, साम टीव्ही

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीच्यावेळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या निवडणुकी दरम्यान सातारा जिल्हा परिषदेच्या परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र आता हाती लागले आहे. या पत्रात पीओपीचे काम सुरू असल्याने सीसीटीव्हीचा वायर तुटल्यामुळे तळमजल्यावरील बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याचे या पत्रात म्हटले आहे. हे पत्र 16 मार्चचे असून 20 तारखेला या निवडी झाल्या होत्या. या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील हे त्यांच्या सदस्यांना मतदानासाठी सभागृहात घेऊन जाताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप या दोन्ही मंत्र्यांनी केला होता.

याचे पडसाद विधानसभा आणि विधानपरिषदेत देखील पडले. मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी या प्रकरणात पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. त्याचाच भाग म्हणून पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना रजेवर पाठवण्यात आले आहे. या वायरल झालेल्या पत्रामुळे आता नेमकं गोंधळ झालेल्या दिवशी सभागृहाच्या परिसरातील कॅमेरे तरी सुरू असणार का याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com