Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

If Thackeray Was Truly a Brand: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाकरे हे आता ब्रँड राहिलेले नाहीत, असे म्हणत त्यांनी बाळासाहेबांच्या काळातही 288 जागा जिंकता आल्या नव्हत्या, असे विधान केले.

राज्यातील शेतकऱ्यांचे संकट आणि परिस्थिती सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे. हाडोळती येथील अंबादास पवार यांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सर्वतोपरी मदत करण्याचा आश्वासन सभागृहात दिलं होतं. मात्र, ती आणखीन मिळाली नाही त्यामुळे मी कृषीमंत्र्यांना देखील सभागृहात प्रश्न विचारणार असल्याचे बुलढाणा येथील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. ते आज अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकऱ्याच्या मदतीसाठी आले होते यावेळी ती बोलत होते.

दोन्ही ठाकरे बंधू पंधरा वर्षांपूर्वीच एकत्र आले असते ,तर काही परिणाम जाणवला असता, मात्र बाळासाहेबांचे विचार सोडून उद्धव ठाकरे गेले, त्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिलेलं नाही. तर राज ठाकरेंनी देखील टाळीला टाळी देण्यासाठी खूप उशीर केला आहे. त्यामुळे या एकत्र येण्याचा महाराष्ट्राला कुठलाही फरक पडणार नाही. असं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे. ते आज लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील वयोवृद्ध शेतकऱ्याला मदत करण्यासाठी आले होते.

ठाकरे नावाचा ब्रँड आता राहिलेला नाही, लोकांची किती काम करतात हे महत्त्वाचं आहे. ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब ठाकरे असतानाच 288 आमदार निवडून आले असते, त्यावेळी देखील 70 ते 74 जागा निवडून आणता आल्या नाहीत.,असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. ते आज लातूर येथे बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com