MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड
दिलीप कांबळे, साम प्रतिनिधी
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या संभाव्य हत्येचा कटाचा पर्दाफाश झालाय. यासंदर्भात आमदार शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडत गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या सूचनेला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचा निर्णय सात दिवसांत घेणार असल्याची ग्वाही दिली. परंतु प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एसआयटी स्थापन करण्यात आल्याचंही कदम म्हणालेत.
पिंपरी-चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या दरोडाविरोधी पथकाने गुप्त माहितीनुसार तळेगाव दाभाडे परिसरात कारवाई केली होती. यात सुरुवातीला दोन गुन्हेगार पकडण्यात आले होते. त्यानंतर तपासाचा विस्तार करत एकूण ७ सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींकडून ९ पिस्तूल, ४२ जिवंत काडतुसे, कोयते अशा प्राणघातक शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर आधी खून, खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, खंडणी, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, लूट, तोडफोड असे गु्न्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांचा वापर आमदार सुनील शेळके यांची हत्या करण्यासाठीच होणार होता. हे आरोपी मध्यप्रदेश, जालना, वडगाव, काळेवाडी परिसरातील असल्याची माहिती गुन्हेगारांच्या जबाबातून समोर आलीय. दरम्यान या गुन्हेगार आणि आमदार शेळके यांच्यात कोणतेच वैयक्तिक वैर नव्हते. त्यामुळे शेळके यांच्या हत्येचा कट कोण रचत आहे, त्यामागील मास्टरमाईंड कोण याचा तपास केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.