Maharashtra Election : सांगलीत भाजपला जोरदार धक्का, माजी आमदाराने तुतारी घेतली

BJP seat-sharing in maharashtra 2024 : एकीकडे जागावाटप सुरु असतानाच भाजपला इंदापूर आणि सांगलीमध्ये जोरदार धक्का बसला आहे.

Maharashtra politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला जोरदार धक्का बसला आहे. सांगलीमधील माजी आमदाराने तुतारी हातात घेतली आहे. इंदापूरनंतर सांगलीमध्येही भाजपच्या नेत्याने तुतारी हाती घेतली आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावटपाच्या (2024 Maharashtra Legislative Assembly election) जोरदार चर्चा सुरु आहेत. कोणाला कोणत्या जागा मिळणार? यावरुन बैठकावर बैठका होत आहेत. त्यातच भाजपला मात्र धक्क्यावर धक्के बसत आहेत. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतली होती. आता संगलीमध्येही माजी आमदाराने भाजपपासून फारकत घेतली आहे. (maharashtra assembly election 2024)

भाजपाचे माजी आमदार आणि आटपाडी खानापूरचे नेते राजेंद्र देशमुख यांनी गुरुवारी भाजपाला रामराम ठोकलाय. राजेंद्र अण्णा देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केल्याचं केलं जाहीर.

राजेंद्र अण्णा देशमुख यांनी शरद पवारांची सांगलीत गुरुवारी भेट घेतली. भेटीनंतर भाजप सोडत असल्याचं त्यांनी जाहीर केलं. भाजपाने आम्हाला शिवसेना शिंदे गटाला विकल्याचा आरोप करत भाजप सोडत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Elections : कोल्हापुरातून काँग्रेसचं रणशिंग, 14 वर्षांनंतर राहुल गांधी करवीरनगरीत येणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com