Samruddhi Mahamarg: 'समृद्धी' महामार्गावरील दरोड्याचा मुख्य सूत्रधार जेरबंद, आरोपीचा फोटो समोर

Samruddhi Mahamarg Daroda: समृद्धी महामार्गावर दरोडा टाकण्यात आला. या दरोड्याच्या मुख्यसुत्रधाराला पोलिसांनी बीडमधून अटक केली. त्याचा फोटो समोर आला आहे.

समृद्धी महामार्गावरील दरोड्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. किरण गायकवाड असं बीडमधून अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीचा फोटो समोर आला आहे. सिन्नर तालुक्यात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी वाहनांचे टायर पंचर करून प्रवाशांना लुटलं होतं. यावेळी त्यांनी शस्त्रांच्या बळावर प्रवाशांना बेदम मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लुटली होती. दरम्यान, या टोळीतील इतर फरार साथीदारांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मालडहून आणि दृशिंगपूर शिवारात गेट क्रमांक 538 ते 543 दरम्यान गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. याच दरोडेखोरांच्या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी बीडच्या शिरूर तालुक्यातून अटक केली. या टोळीचा मुख्य सूत्रधार किरण अजिनाथ गायकवाड राहणार हिवरसिंगा याला तांत्रिक आणि गुप्तहेरांच्या माहितीवरून पोलिसांनी अटक केली. या दरोडेखोरांनी खिळे आणि टोकदार लोखंडी पट्ट्यांचा वापर करत वाहनांचे टायर पंचर केले होते. त्यानंतर प्रवाशांची लूट केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com