मनोज जयस्वाल, वाशिम | साम टीव्ही
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आलिशान कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक १६७ वर घडली आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक १६७ वर भीषण अपघात झाला. आलिशान कारचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून ती दुभाजकाला धडकून उलटली. हा अपघात नागपूर लेनला झाला असून,या अपघातात पाच जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जखमींवर तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून पुढील उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.