राज्यात टोरेस घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर ३ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून ३५ कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलंय. एका वर्षासाठी एक लाख रुपये १० महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा तीन टक्के परतावा मिळेल. त्याचबरोबर परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असे आमिष दाखवून सुमारे ८०० जणांना ३५ कोटी रुपयांचा गंडा घातला.
शहरातील जिन्सी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी, प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. शीतल सुधाकर मोतिंगे, विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केलीय. छत्रपती संभाजीनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून याचा तपास सुरू आहे. मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार घेऊन कंपनीत गुंतवणूक केल्यास महिना ३ टक्के परतावा देण्याचे आमिष गांधी व शहाने दाखवले होते. सुरुवातीच्या काळामध्ये दर महिन्याला गुंतवणूकदारांना त्यांना रक्कम मिळायची मात्र काही दिवसानंतर ती बंद झाली. पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदार घाबरले. त्यांनी कंपनीच्या मुख्य शाखेत धाव घेतली. तेव्हा शाखाच बंद आढळली. आरोपी शीतल व विठ्ठलने त्यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क बंद केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.