Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation: छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका निवडणुकीमध्ये कुणाची सत्ता येणार हे काही तासांत चित्र स्पष्ट होईल. या महानगर पालिकेत भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेवर कुणाची सत्ता येणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. या महानगर पालिकेच्या राजकारणाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. याठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेने खूप जोर लावला. त्याचसोबत एमआयएमने देखील जोरदार प्रचार केला. याठिकाणी भाजप आणि शिंदेसेना स्वतंत्र निवडणूक लढले. याठिकाणी ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या महानगर पालिका निवडणुकासाठी जास्त जोर लावला.

साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. ३६ वॉर्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे २४, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ४ उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे. तर इकडे काँग्रेसचे ८, शिवसेना ठाकरे गट १२, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३ आणि एमआयएम २४ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे. तर इतर ४ जागांवर विजयी होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com