Saam Maha Exit Poll : भोकरदन काँग्रेसचा बालेकिल्ला; संभाव्य नगराध्यक्ष आणि सत्तेचाही 'पंजा'!

saam maha exit poll bhokardan congress stronghold : जालना जिल्ह्यातील भोकरदन पालिका निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. साम टीव्ही महाएक्झिट पोलच्या अंदाजानुसार, तिरंगी लढतीत काँग्रेस बाजी मारणार अशी शक्यता आहे. नगराध्यक्षही काँग्रेसचाच होणार असल्याचा अंदाज आहे.

अक्षय शिंदे, जालना

जालना जिल्ह्यातील भोकरदन पालिकेवर काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज आहे. साम टीव्हीच्या महाएक्झिट पोलमधून हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसच्या प्रियंका देशमुख या संभाव्य नगराध्यक्षा होतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाचे आठ ते नऊ नगरसेवक निवडून येतील. त्यामुळे काँग्रेसचीच सत्ता कायम राहील, अशी चर्चा आहे.

भोकरदन पालिका निवडणुकीत तिरंगी लढत बघायला मिळाली. भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत होती. ही प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. सर्व दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा या ठिकाणी झाल्या. पाणी आणि स्वच्छतेचा प्रश्न प्रचारातून मांडण्यात आला. या ठिकाणी ३५ वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. यंदा पुन्हा काँग्रेस बाजी मारण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com