Rinku Singh And Priya Saroj: क्रिकेटपटू आणि खासदार यांचा साखरपुडा सोहळा संपन्न|VIDEO

From Cricket to Parliament: भारतीय क्रिकेटपटू रिंकु सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा लखनऊ येथे मोठ्या दिमाखात पार पडला.

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू रिन्कू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी आज आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत साखरपुडा केला. लखनऊ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.

या समारंभाला सापाचे अध्यक्ष अखिलेश यादव, खासदार डिंपल यादव, खासदार जया बच्चन, सपाचे नेते शिवपाल सिंह यादव, खासदार राम गोपाल यादव, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी खासदार मोहनलालगंज सुशीला सरोज, माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पीयूष चावला तसेच उत्तरप्रदेश रणजी संघाचा कर्णधार आर्यन जूयाल यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com