Ravindra Waikar Meet Raj Thackeray | रवींद्र वायकरांसाठी राज ठाकरे सभा घेणार?

मुंबई वायव्यचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रवींद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाने गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई वायव्य मतदारसंघात दोन शिवसैनिक लढणार आहेत.

मुंबई वायव्यचे शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रवींद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाने गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई वायव्य मतदारसंघात दोन शिवसैनिक लढणार आहेत. रवींद्र वायकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेऊन निवडणुकीवर चर्चा केली. यावेळी वायकर यांनी मतदारसंघात केलेल्या कामाबद्दल राज ठाकरेंना माहिती दिली. ही फक्त सदिच्छा भेट होती असेही वायकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि नंतर राज ठाकरेंनी दोघांसाठी सभाही घेतली होती. त्यामुळे राज ठाकरे वायकरांसाठी सभा घेणार का असा सवाल विचारला जातोय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com