Video
Ravi Rana News | उद्धव ठाकरेंच्या संदर्भात रवी राणांचा मोठा दावा,नेमकं काय म्हणाले?
Ravi Rana News Today | ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात आमदार रवी राणा यांना मोठा दावा केला आहे.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर उद्धव ठाकरे एनडीएमध्ये येणार, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा दोन लाखांनी जिंकणार असल्याचा विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. लोकसभेच्या निकालासाठी अवघे दोनच दिवस बाकी आहेत.पण एक्झिट पोलच्या आकडेवारीनं अनेकांची झोप उडवलीये. या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात सुद्धा वेगळंच चित्र पाहायला मिळालं. पण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा एक्झिट पोल हा इंटरेस्टिंग आहे. यावेळी एक्झिट पोलची आकडेवारी ही नवनीत राणा यांच्या बाजूने आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.