Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; ठाकरे सेनेची अचानक एन्ट्री

Rahuri By Polls : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला असून, ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळं आता नेमका निर्णय काय होतो, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक होत आहे. या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जाऊ नये, अशी भूमिका ठाकरे सेनेच्या काही नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली असतानाच, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे. ठाकरे सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून, ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रवाना झाल्याचे वृत्त आहे.

शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारीसाठी ठाकरे गटाचे नेते खेवरे हे इच्छुक आहेत. पोटनिवडणुकीत पक्षाची भूमिका, निवडणूक रणनीती आणि संभाव्य उमेदवारी याबाबत खेवरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर पुढील दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com