Manoj Jarange : मनोज जरांगेचं समाधान होत नाही, त्यांना जास्त हवे आहे, दानवे स्पष्टच बोलले, पाहा व्हिडिओ

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी विधानसभेला खुशाल उमेदवार उभे करावेत, त्यांना तो अधिकार आहे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

Maratha Reservation : आम्हाला कायद्याच्या चौकटीत जेवढे आरक्षण देता येत होतं, तसं आम्ही दिलाय. त्याच्यावर त्यांचं (Manoj Jarange) समाधान होत नाही. त्यांना त्यापेक्षा जास्त काही लागतं, तो मागण्याचा त्यांना अधिकार आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी दिलीय. महाविकास आघाडीला लोकसभेला जास्त मते पडलीत, त्यामुळं शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मनोज जरांगेंच्या मताप्रमाणे ओबीसीतून आरक्षण देण्याचं जाहीरनाम्यात टाकावं, असं आव्हान देखील रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीला दिलंय. तर मनोज जरांगे यांनी खुशाल उमेदवार उभे करावेत त्यांना तो अधिकार आहे, असेही रावसाहेब दानवे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com