पुणे: जिल्ह्यातील रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत मोठा घोळ समोर आला आहे. चाकण येथील एक तरुण रांजणगाव गणपती मतदार केंद्रात मतदानासाठी आला असताना पकडला गेला. व्हिडिओत या तरुणाने खुलासा केला की तो भाजपाच्या कमळावर मतदान करण्यासाठी आला होता. त्यामुळे भाजपकडून बाहेरून मतदार आणल्याचा आरोप उठत आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस तपास सुरु केले आहेत. पोलिसांनी या घटनेचा सखोल अभ्यास सुरु केला असून दोषींवर योग्य कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.