Ramesh Mhatre Case Update : डोंबिवलीतील शास्त्रीनगर पालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले माजी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने कठोर अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे.
६ जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU विभाग फुल्ल असल्याने डॉक्टरांनी एका नवजात बाळाला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. यावरून झालेल्या वादातून रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात घुसून महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता आणि पोलिसांकडून म्हात्रेंसह अन्य आरोपींना ८ जुलै रोजी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणात जामीन मंजूर करताना उच्च न्यायालयाने अत्यंत कडक अटी लादल्या आहेत. आरोपींना खटल्यादरम्यान महाराष्ट्राबाहेर राहावे लागणार असून, गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहून आठवड्यातून तीनदा स्थानिक पोलिसांकडे हजेरी लावावी लागेल. तसेच साक्षीदारांवर दबाव आणण्यास आणि पीडितांशी संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली आहे. हा खटला जलदगती (फास्टट्रॅक) न्यायालयात चालवला जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.