Rajya Sabha Election: राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार? दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि राष्ट्रवादीच्या राजकीय रणनीतींवर चर्चा रंगलीय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी महत्त्वाची बैठक सुरू आहे.
Rajya Sabha Election:
NCP leaders are holding crucial discussions over the vacant Rajya Sabha seat after Sunetra Pawarsaam tv
Published On
Summary
  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी उमेदवार निश्चित

  • सुनेत्रा पवार आमदार झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त

  • छगन भुजबळ आणि नवनीत राणा यांच्या नावांची उमेदवारीसाठी जोरदार चर्चा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट राष्ट्रवादीची आज बैठक होत आहे. राज्यसभेच्या रिक्त जागे संदर्भात आता त्यांच्यात चर्चा होत आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर कोण जाणार यावर सविस्तर चर्चा केली जात असून सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोण जाणार यावरचा निर्णय थोड्याच वेळात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. सुनेत्रा पवार या विधानसभा निवडणूक जिंकून आमदार झाल्यानंतर त्यांची राज्यसभेची जागा रिक्त आहे. त्या जागेवर राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी लागणार आहे, याची चर्चा आजच्या बैठकीत घेतली जात आहे.

उमेदवारांचा नामांकन दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान काही दिवसापुर्वी नवनीत राणा यांनी सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांची राज्यसेभेसाठी संधी मिळू शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. पण दुसऱ्या बाजुला छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रवादीमधील उमेदवार कोण असणार हे नाव समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com