Gyayak Patani News : कारंजामधून भाजपला धक्का, ज्ञायक पाटणींचा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश

Rajendra Patani's Son Gyayak Patani Join NCP (SP) : दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी हे कारंजा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असून त्यासाठी त्यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दिवंगत राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. ज्ञायक हे आता तुतारीच्या चिन्हावर कारंजा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ज्ञायक पाटणी यांनी मुंबईत समर्थकांसह पक्षात प्रवेश केला.

फेब्रुवारीमध्ये राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पुत्र ज्ञायक पाटणी हे कारंजामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्याने आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करत तुतारी चिन्हावर या ठिकाणावरून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभेत हा भाजपला मोठा धक्का असणार आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com