Raj Thackeray Speech : राजकीय नेत्यांमुळं महाराष्ट्राचं वाटोळं; राज ठाकरेंचा जोरदार प्रहार

Raj Thackeray Speech in Pune : महाराष्ट्रातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारण्यांवर तुफान हल्ला चढवला. महाराष्ट्राचं वाटोळं झालं आहे, त्याला राजकीय नेते जबाबदार आहेत, असं ते म्हणाले.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात झालेल्या वसंत व्याख्यानमालेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र, मराठी भाषा, रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य यांसह महिला सुरक्षितता आदी मुद्द्यांवरून राजकारणी मंडळींना लक्ष्य केलं. आमच्याकडे कवी कोण, लेखक कोण हा जातीतून बघितला जातो. मराठीवरून तुम्ही एकत्रित येऊ नये, असा बंदोबस्त केला जात आहे, असं सांगतानाच, महाराष्ट्राचे जे वाटोळे झाले आहे, त्याला राजकीय नेते जबाबदार आहेत, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com