छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात नेमकं काय म्हटलंय? राज ठाकरेंनी वाचून दाखवलं...हा VIDEO डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा

Chhatrapati Shivaji Maharaj’s Aagyapatra : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीबाबत नेमके काय म्हटले आहे? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज्ञापत्रातील उतारा वाचून दाखवत जंगलतोड आणि विकास प्रकल्पांवरून राज्यकर्त्यांना सवाल केले.

Chhatrapati Shivaji Maharaj’s Aagyapatra : केवळ महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांच्या दिवशी हार घालणे म्हणजे आपले कर्तव्य संपत नाही, असे खडे बोल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावले. राज ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील 'आज्ञापत्र' वाचून दाखवले आहे. वृक्षतोड आणि प्रकल्पांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्यकर्त्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे.

स्वराज्यातील आंबे, फणस, चिंच किंवा इतर थोर आणि लहान वृक्ष रयतेने लेकरांसारखी जपून वाढवले आहेत. आरमार किंवा इतर कामासाठीसुद्धा ही झाडे तोडण्यास सक्त मनाई होती, आणि बाहेरील राज्यातून लाकूड आणले जावे असे महाराजांनी स्पष्ट निर्देश दिले होते. रयतेने लेकरांसारखी जपून वाढवलेली झाडे तोडल्यामुळे त्यांना होणाऱ्या दुःखास पारावर उरत नाही.

जो महाराष्ट्र शिवरायांचे ऐकणार नाही, त्याला परमेश्वरच वाचवू शकतो, असे राज ठाकरे म्हणाले. तुम्ही अजून किती दिवस आमदार-खासदारांची वाट पाहत बसणार? असे राज ठाकरे म्हणाले.

आरमारास तख्ते, सोट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकूड असावे लागते. ते आपले राज्यात अरण्यामध्ये सागवानादि वृक्ष आहेत त्यांचे जे अनुकूल पडेल ते हुजुर लेहून हुजरचे परवानगीने तोड्न न्यावे. याविरहीत जे लागेल ते परमुलकीह्न खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे फणस आदिकरून हेही लाकडे आर-माराचे प्रयोजनाची. परंतु त्यांस हात लाऊ न द्यावा. काये म्हणोन की ही झाडे वर्षा दो वर्षानी होतात येसे नाही. स्वतेने ही झाडे लाऊन लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिलियावरी त्यांचे दुःखास पारावार काये ? येकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल ते कार्य करणारासहीत स्वल्पकाळेच बुडोन नाहिसेच होते. किंबहुना धन्याचेच पदरी प्रजापीडणाचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावे हानीहि होते. याकरिता हे गोष्ट सर्वथा होऊ न द्यावी. कदाचित येखादे झाड जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन न्याच्या संतोष न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com