राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

Rahul Gandhi Detained During Delhi Protest Released After 3 Hours: दिल्लीतील आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तीन तासांनी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली असून, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून, काल झालेल्या लाठीचार्जच्या कारवाईचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे सर्व खासदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी यांना घेराव घालत ताब्यात घेतले होते. सुमारे तीन तासांनंतर दिल्ली पोलिसांनी त्यांची सुटका केली. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. तसेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि इंडिया आघाडीतील इतर प्रमुख नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com