Rahul Gandhi : चीनने 4000 किमी अंतर कापले, 20 सैनिक शाहिद झाले, राहुल गांधींच लोकसभेत दमदार भाषण,VIDEO

Trump’s tariff on India : लोकसभेत आणि राज्यसभेत वक्फ विधेयकावरून कालपासून मोठा गदारोळ चालू आहे, मात्र देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वेगळ्याच मुद्याला हात घालून लक्ष वेधले.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रेसिप्रोकल टॅरिफबाबत मोठी घोषणा करून जगातील देशांना चांगलाच धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी भारतालाही जबर धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी भारतावर 26 टक्के टॅरिफ लावण्याची अंमलबजावणी केली आहे. यावरच लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी हे आक्रमक झाले होते.यामुळे भारताच्या आर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होईल अस सांगत राहुल गांधी यांनी चिनी कब्जाचा मुद्दा देखील उपस्थित केला.

काही दिवसापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी चिनी राजदूतासोबत केक कापल्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता.यावरच राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राहुल गांधी म्हणाले, चीनने 4000 किमी अंतर कापले, 20 सैनिक शाहिद झाले,पण आपले परराष्ट्र सचिव राजदूतासोबत केक कापत आहे.पंतप्रधान आणि राष्ट्रपती चीनला पत्र लिहीत आहेत.हे सरकार नव्हे तर चिनी राजदूत सांगत आहेत. विक्रम मिस्त्री आपल्या सैनिकांच्या शाहीदत्वचा केक कापण्यासाठी चिनी दुतावासात गेले होते का? असा सवालाही राहुल गांधी यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com