Air Strike : तुमची वेळ संपली...डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् येमेनवर एअरस्ट्राइक, २६ जणांचा मृत्यू

Yemen Air Strike: रेड सी शिपिंगवर झालेल्या हल्ल्याचा बदला अमेरिकेने घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर येमेवर एअरस्ट्राइक करण्यात आले. यामध्ये २६ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Air Strike : तुमची वेळ संपली...डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् येमेनवर एअरस्ट्राइक, २६ जणांचा मृत्यू
Yemen Air Strike Saam Tv
Published On

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी रेड सी शिपिंगवर झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचे आदेश अमेरिकन सैन्यांना दिले. डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या कोणत्याही शत्रूला सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. ट्रम्प यांच्या आदेशानंतर येमेनमध्ये इराण समर्थित हुथी विद्रोहींच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. हूती विद्रोहींच्या तळावर मोठ्या प्रमाणात लष्करी हल्ले करण्यात आले. या हल्ल्यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला.

येमेनमध्ये हुथी बंडखोरांवर अमेरिकन सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला. डझनभर लोकं जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकन जहाजांवर केलेला कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याला येमेनमधील हुथी दहशतवाद्यांवर निर्णायक आणि शक्तिशाली लष्करी कारवाई करण्याचे आदेश दिलेत.

Air Strike : तुमची वेळ संपली...डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् येमेनवर एअरस्ट्राइक, २६ जणांचा मृत्यू
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला धक्का, परस्पर शुल्क लागू होणार; थेट तारीखच जाहीर केली

येमेनच्या लाल समुद्राच्या प्रदेशाचा बराचसा भाग नियंत्रित करणारे हुथी विद्रोही गाझामधील पॅलेस्टिनींच्या समर्थनार्थ वर्दळीच्या सागरी मार्गाला लक्ष्य करून कारवाया करत आहेत. ट्रम्प यांनी हुथींचा मुख्य समर्थक असलेल्या इराणला तात्काळ या गटाला पाठिंबा देणे थांबवण्याचा इशारा दिला. ट्रम्प यांनी सांगितले की, जर इराणने अमेरिकेला धमकी दिली तर अमेरिका 'तुम्हाला जबाबदार धरेल आणि आम्ही त्याच्याशी चांगले वागणार नाही.'

Air Strike : तुमची वेळ संपली...डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् येमेनवर एअरस्ट्राइक, २६ जणांचा मृत्यू
Donald Trump News : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प युग आलं; त्या 7.25 लाख भारतीयांचं टेन्शन वाढलं, कारण काय?

इस्रायलने गाझामध्ये मानवतावादी मदत थांबवली आहे. यामुळे गाझामधील लोकांपर्यंत अन्न, पाणी आणि औषधे पोहोचत नाहीत आणि २० लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इस्रायलने गाझाला मानवतावादी मदत रोखण्याच्या हालचालीनंतर हुथी दहशतवाद्यांनी इस्रायली जहाजांवर पुन्हा हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर हे हल्ले झाले. या गटाने म्हटले आहे की ते लाल समुद्रात सर्व इस्रायली जहाजांच्या हालचालींवर बंदी पुन्हा लागू करत आहेत.

Air Strike : तुमची वेळ संपली...डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश अन् येमेनवर एअरस्ट्राइक, २६ जणांचा मृत्यू
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, मुकेश अंबानींसह कोण कोण उपस्थित राहणार? १० पॉईंट्समधून समजून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com