VIDEO: "BJP च्या नकली हिंदुत्वाचा चेहरा Rahul Gandhi यांनी उतरवला", राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut News: राहुल गांधी यांनी सोमवारी सभागृहात पहिल्यांदाच भाषण केलं, यादरम्यान त्यांनी भाजपवर टिका केली आहे.

राहुल गांधी यांची विरोधीपक्षपदी निवड झाल्यानंतर सोमवारी सभागृहात पहिल्यांदाच भाषण केलं. यादरम्यान हिंदुत्वाच्या मुद्यावरुन त्यांनी भाजपवर टीका केली होती. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या नकली हिंदुत्वाचा चेहरा राहुल गांधी यांनी उतरवला असल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे जे उत्तर देतात तेच राहुल गांधी यांनी दिलं. राहुल गांधी यांनी काल सांगितलं भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, तुम्ही हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. एक अकेला सब पे भारी अस चित्र काल होतं. ९ मंत्री राहुल गांधी बोलत असताना उभे राहिले. आजपर्यंत संरक्षण आम्हाला मागावं लागत होतं, परंतु काल त्यांना संरक्षण मागावं लागलं. राहुल गांधी यांनी काल त्यांना गुडघ्यावर आणल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com