पुण्यातील कॉलेजबाहेर गांजाविक्री? मनसैनिकांना घेऊन अमित ठाकरेंनी टाकली दुकानावर धाड|VIDEO

Amit Thackeray Inspects Shops Near College In Pune Over Alleged Drug Sales: पुण्यातील कॉलेज परिसरात गांजा, गुटखा आणि इतर नशेचे पदार्थ मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिल्यानंतर अमित ठाकरे यांनी मनसैनिकांसह दुकानांची पाहणी केली.

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी करण्यास गेलेले मनसे नेते अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. या कॉलेजमध्ये गेल्यावर अमित ठाकरे यांनी कँटिनमध्ये मिळणारे जेवण आणि खेळाडूंना प्रशिक्षण मिळत नसण्यावरून कॉलेजच्या अधीक्षक आणि मुख्याध्यापकाना जाब विचारला. तसेच बाहेर आल्यानंतर अमित ठाकरे यांनी थेट कॉलेजच्या परिसरात असलेल्या एका दुकानावर धाड टाकत या ठिकाणी सिगारेट, गुटखा विक्री होते आहे का? याची पाहणी केली. दरम्यान वाडिया कॉलेजच्या समोर असणाऱ्या एका दुकानांमध्ये गुटखा गांजा आणि इतर नशेचे पदार्थ मिळत असल्याचं विद्यार्थ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर अमित ठाकरे या दुकानांमध्ये गेले त्यांनी दुकानदारांशी चर्चा करून पोलिसांना बोलवून घेतलं. पुणे शहरांमध्ये अशा पद्धतीने जर सगळे नशेचे पदार्थ मिळत असतील तर हे पुणे पोलीस आणि यंत्रणेला माहित आहे. त्यामुळे सरकार काय करते असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com