राज्याच्या विधान परिषदेच्या २०२६ मधील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान दोन चिठ्ठ्या आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे. पहिल्या चिठ्ठीमध्ये ‘आम्हाला कोणी विकत घेऊ शकत नाही. २००४ पूर्वीची जुनी पेन्शन लागू करा, नाहीतर बघा!’ असा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसऱ्या चिठ्ठीमध्ये ‘पदवीधरांचे काम करा, अन्यथा पाप लागेल’ असा संदेश लिहिलेला होता. मतमोजणीदरम्यान या दोन्ही चिठ्ठ्या आढळल्याने शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांबाबत व्यक्त करण्यात आलेल्या या संदेशांची चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.