Pune : माय-लेकांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार; पुण्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune News Today : पुण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ससून रुग्णालयात उपचारादरम्यान आईचे निधन झाल्याची बातमी समजताच २५ वर्षीय मुलाने आत्महत्या केली.

Pune mother and son tragedy पुण्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी आणि अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने, एका २५ वर्षीय एकुलत्या एक मुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. साहिल दोडके असं तरुणाचं नाव आहे. चार बहिणींनंतर जन्माला आलेल्या साहिलच्या आयुष्याचा आधार त्याची आईच होती. आईच्या निधनाची बातमी ऐकताच खचलेल्या साहिलने टोकाचं पाऊल उचललं. अखेर नियतीच्या क्रूर खेळामुळे आज त्या माऊली आणि लेकावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ कुटुंबावर आली.

मंदा दोडके (वय ५०) आणि साहिल गणेश दोडके (वय २५,रा. पर्वती दर्शन) अशी या मायलेकाची नावे आहेत. दोडके कुटुंब मूळचे दांडेकर पूल परिसरातील रहिवासी आहेत.तिथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने ते काही दिवसांपूर्वीच पर्वती दर्शन परिसरात भाड्याने राहायला आले होते. मंदा दोडके या वृद्ध रुग्णांच्या सेवाशुश्रूषेचे काम करायच्या.चार बहिणींनंतर जन्माला आलेला साहिल एकुलता एक मुलगा होता.पहाटे उठून लोकांच्या घरी दुधाच्या पिशव्या टाकणे आणि लिफ्ट दुरुस्तीची कामे करणे असा त्याचा दिनक्रम होता.

मंदा दोडके यांना गुरुवारी पहाटे अर्धांगवायूचा झटका आला.साहिलने त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र,त्यांची प्रकृती खालावत होती. घटनेच्या दिवशी साहिल आईसाठी चहा घेऊन रुग्णालयात गेला. मात्र, त्याच्या आईचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आईला वाचवू न शकल्याच्या दुःखातून त्याने तातडीने घर गाठले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com