Pune Ganeshotsav: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा व्हिडिओ

Pune Manache Ganpati Immersion Ceremony : पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन करण्यात आले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतींना भक्तांनी भावपूर्ण निरोप दिला.

पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती अशा पाचही मानाच्या गणपतींच्या मूर्तींचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला कसबा गणपतीच्या मिरवणुकीने सुरूवात झाली. महात्मा फुले मंडईतून सकाळी 9.40 ला कसबा गणपतीची मिरवणूक निघाली होती. 10.28 वाजता मिरवणूक बेलबाग चौकात आली. त्यानंतर सायंकाळी 4.40 मिनिटांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले.

तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणुकीला सकाळी 10 वाजता सुरूवात झाली. सकाळी 11.25 ला हा गणपती बेलबाग चौकात आला. 7 तास 15 मिनिटे मिरवणूक चालल्यानंतर सायंकाळी 5 वाजता तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन करून निरोप देण्यात आला.

त्यानंतर गुरुजी तालीम गणपतीची मिरवणूक सकाळी 10.15 वाजता मंडईतून निघाली. ही मिरवणूक 7 तास 20 मिनिटे चालली. त्यानंतर 5.05 मिनिटांनी गणरायाला विसर्जन करून निरोप देण्यात आला.

पुण्यातील चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपतीची मिरवणुकीला सकाळी 10.45 वाजता सुरूवात झाली. दुपारी 1.54 वाजता बेलबाग चौकात पोहोचल्यानंतर सायंकाळी 5.34 वाजता बाप्पाचे विसर्जन झाले.

पारंपरिक लवाजमा, ढोल-ताशांच्या गजरात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी सव्वा आकरा वाजता सुरूवात झाली. मंडईतून ही मिरवणूक दुपारी 3 वाजता बेलबाग चौकात पोहचली. सायंकाळी 6.15 वाजता बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com