पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये राडा! काँग्रेस आणि ABVP च्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Congress And ABVP Workers Clash : राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधी सीओईपी कॉलेजमध्ये राजकीय वातावरण तापलं. ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाच्या तयारीवरून काँग्रेस आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या दौऱ्याआधी पुण्यातील वातावरण तापलंय. काँग्रेस आणि अखिल विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. पुण्यातील सीओईपी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि एनएस युआयच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. उद्या शनिवारी छात्रों की गुंज कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. त्या कार्यक्रमावरून काँग्रेस आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झालीय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. मात्र त्यावरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com