जनगणनेच्या कामात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार; महापालिकेचा मोठा निर्णय

Pune Municipal Corporation Census Delay Action Against Employees: पुण्यात जनगणनेच्या कामात दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिकेने कडक निर्णय घेतला आहे. कामावर हजर न झाल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

पुणे: राष्ट्रीय जनगणनेच्या अत्यंत महत्त्वाच्या कामाला दांडी मारून प्रशासनाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आता गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. कामं टाळून दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुणे महानगरपालिकेने शेवटची संधी दिली असून, तरी जर काम सुरू न केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याच्या स्पष्ट इशारा पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला आहे. प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर जनगणनेच्या कामाची जबाबदारी आहे. पुण्यात १५ मे ते १४ जून या एका महिन्याच्या कालावधीत घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, मात्र महिना संपत आला तरी केवळ ४० टक्केच काम पूर्ण होऊ शकले आहे. जनगणनेसाठी सुमारे ११ हजार प्रगणक आणि १६०० पर्यवेक्षक आहेत यातील २००० जणांनी दांडी मारली होती मात्र आता त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिल्याने पोलिसांकडून सुद्धा त्यांना नोटीस आणि फोन गेल्यामुळे यातील अनेक जणं आज कामावर रुजू झाले आहेत अशी माहिती दिवटे यांनी दिली आहे. मात्र आता महापालिकेने केलेल्या शेवटच्या आव्हानाला प्रतिसाद दिला नाही तर कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात चे आदेश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com