सचिन कदम, साम टीव्ही
रायगड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पेण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रमोद म्हसकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. म्हसकर यांनी राजीनामा देताना पत्रात कोणतेही कारण स्पष्ट केलेले नाही. मात्र, पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. प्रमोद म्हसकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक महिन्यांपासून ते प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून रायगड जिल्हयात सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते. त्यामुळे तयांच्या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान म्हसकर यांच्या राजीनाम्यामुळे रायगडमध्ये काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.