उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला यावेळी महायुती सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान तिघांनीही एकमेकांना कोपरखळी मारल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरून महायुतीमध्ये मोठे घामासान पाहायला मिळाले. तसेच एकनाथ शिंदे हे नाराज होऊन दरी गावात जाऊन बसले होते. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी अडून बसले होते. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस विजय झाले आणि एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीच्या खुर्चीवर जाऊन बसावे लागले पण ते नाराज होते असं अनेक वेळा दिसून आलं आणि विविध सूत्रांनी देखील सांगितले
नेमके काय घडले?
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी अजित पवारांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेले काही ठळक मुद्दे सांगितले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बोलण्यास सुरुवात केली त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी गेल्यावेळी 'आम्ही तिघे होतो आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे' असे म्हटले यावर पत्रकारांसह सर्वजण हसायला लागले.
त्यानंतर अजित पवारांनी तुमच्या मनातून ते काही जात नाही असे हसत हसत म्हटले त्यानंतर एकच हशा पिकला. मात्र एकनाथ शिंदेने वाक्याची सारवा सराव करत अदलाबदल झाले असले तरी टीम तीच आहे असे म्हटले यावरूनच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आपले नाराजी उघडपणे दाखवली अशी चर्चा मात्र तिथे रंगली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.