VIDEO : PM मोदींच्या भाषणाची सुरुवात मराठीतून, बघा काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथील आपल्या सभेत भाषणाची सुरुवात दमदार मराठी बोलून केली. त्यांचे हे मराठी भाषण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ठाणे शहरातील अंतर्गत मेट्रो प्रकल्प, छेडा नगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग प्रकल्पाचे भूमीपूजन व उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपले सरकार विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील देवी शक्तीचे साडेतीन शक्तिपीठांना नमन करून त्यांनी आपलं भाषण सुरू केलं. मी एक आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. असंही त्यांनी यावेली म्हंटलं आहे. यावेळी त्यांनी मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा हा समृद्ध परंपरेचा सन्मान असल्याचाही दावा केला. मी एक आनंदाची बातमी घेऊन महाराष्ट्रात आलो आहे. केंद्राने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा केवळ मराठी भाषा व महाराष्ट्राचा सन्मान नव्हे तर देशाला ज्ञान, दर्शन, आध्यात्म व साहित्याची समृद्धी देणाऱ्या परंपरेचा सन्मान आहे, असं त्यांनी म्हंटल. दरम्यान, हे सर्व भाषण त्यांनी मराठीत केल्याने त्यांच्या या जोरदार मराठीची आता चर्चा होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.