VIDEO : 'महाराष्ट्राचा विकास करणं मविआच्या हाताबाहेरची गोष्ट', चिमूरच्या सभेत मोदींचा घणघात

PM Modi Chimur Speech : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज चंद्रपूरमधील चिमुर मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. यावेळई त्यांनी महाविकास आघाडी आणि कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

मला गरीबांच्या जिवनात येणाऱ्या अडचणींची जाणीव आहे. त्यांचे जीवन सुलभ बनवण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आमच्या नेतृत्वात कोट्यावधी जनतेला पीएम आवास, मोफत उपचारांची गॅरंटी, 70 वर्षांवरील सर्वच वृद्धांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला आहे. आज एकट्या चिमुरमध्येच 16 लाख कुटुंबांना मोफत रेशन मिळत आहे. गरीब कल्याण योजनांचा सर्वाधिक लाभ आज वंचित समाजाला झालाय. यामुळे 25 कोटी जनता दारिद्र्य रेषेखालून वर आली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी चंद्रपूरच्या चिमुर येथील प्रचार सभेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्राचा विकास करणं महाविकास आघाडीच्या हाताबाहेरची गोष्ट आहे, महायुती सरकारमुळे महाराष्ट्राचा विकास दुप्पट वेगाने होईल, अशी परखड टीकाही यावेळई मोदींनी केली आहे.

पुहे बोलताना मोदी म्हणाले की, 'महायुतीच्या संकल्पपत्रात लाडकी बहीण, शेतकरी, तरुण व महाराष्ट्राच्या विकासासाठी एकाहून एक सरस संकल्प करण्यात आलेत. हे संकल्पपत्र पुढील 5 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी बनणार आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. येथे विकासाच्या अनेक योजना होत आहेत. महायुतीसोबत केंद्रात एनडीएचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार येईल. त्यामुळे कासाचा वेगही दुप्पट वेगाने होईल, असं मोदी म्हणाले.

दरम्यान, यावेळी मोदींनी मविआ आणि कॉंग्रेसवर जोरदार टीका केलेली बघायला मिळाली. महाविकास आघाडीने फक्त विकासाला ब्रेक लावण्याची पीएचडी केली आहे. तर कॉंग्रेसने कामांना अडवून ठेवण्यात डबल पीएचडी केली आहे. महाराष्ट्राचा विकास करणं ही मविआच्या हाताबाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लुटीचा परवाना मिळवू देऊ नका, अशी घणाघाती टीका यावेळी मोदींनी विरोधकांवर केली आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com