Petrol: 'पेट्रोल बंद होणार' असल्याचा मेसेज व्हायरल, मध्यरात्री पेट्रोल पंपावर तोबा गर्दी; पाहा VIDEO

petrol shortage rumour in Yeola Nashik truth: नाशिकच्या येवल्यामध्ये पेट्रोल बंद होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मध्यरात्री पेट्रोल भरण्यासाठी वाहन चालकांनी पेट्रोल पंपावर तोबा गर्दी केली.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर 'पेट्रोल बंद होणार' अशी अफवा पसरली. या एका मेसेजमुळे येवल्यात रात्री नागरिकांनी पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. नागिरक झोपेतून उठले आणि त्यांनी पेट्रोल पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लावल्या. यामुळे येवल्यात एकच गोंधळ उडाला. मात्र देशात कुठेही इंधन टंचाई नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं.

सोशल मीडियावर अफवांचे पेव केव्हा फुटेल याचा काही नेम नाही. अमेरिका- इस्राइल आणि इराण या देशांध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात पेट्रोल बंद होणार अशी अफवा पसरली. या अफवेचा मेसेज सर्वीकडे फिरला आणि रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास झोपेतून उठून आपली वाहने घेऊन नागरिकांनी येवलातील पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केली. भारतात कुठेही इंधन टंचाई नाही असे केंद्र सरकारकडून सांगितले जात असले तरी सोशल मीडियावर इंधन संपल्याच्या अफवा पसरल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com