Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Dog bite cases in Pune: पुण्यातील पर्वती परिसरात वारंवार नागरिकांना चावा घेणाऱ्या पाळीव कुत्र्याच्या मालकासह तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनेक तक्रारीनंतरही उपाययोजना न केल्याने ही कारवाई करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Pet owner legal responsibility in India : पर्वती परिसरात पाळलेला कुत्रा वारंवार नागरिकांना चावत असूनही त्यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे पोलिसांनी मालकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी कुटुंबाने गेल्या सहा वर्षांपासून 'शराबी' नावाचा कुत्रा पाळला आहे. हा कुत्रा परिसरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला असून, त्याने आतापर्यंत १० ते १२ जणांना चावा घेतल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. २ जून रोजी या कुत्र्याने एका व्यक्तीच्या मांडीला गंभीर चावा घेतला, ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नागरिकांनी कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वारंवार विनंती करूनही कुटुंबियांनी दुर्लक्ष केले. अखेर त्रस्त नागरिकांच्या तक्रारीवरून पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com