Parth Pawar: पार्थ पवार झाले खासदार! अजितदादांसारखं जॅकेट घातलं, राज्यसभेत इंग्रजीत घेतली शपथ; पाहा VIDEO

Parth Pawar Sworn in as Rajya Sabha Member: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. अजितदादांसारखं जॅकेट घालून त्यांनी राज्यसभेत इंग्रजीत शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती सी.पी राधाकृष्णन यांनी संसद भवनात पार्थ पवार यांना शपथ दिली. त्यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली. आता ते राज्यसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या शपथविधी सोहळ्याला भाजप नेते जे पी नड्डा, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे उपस्थित होते. या शपथविधीमध्ये पार्थ पवार यांनी वडील अजित पवार यांच्यासारखंच जॅकेट परिधान केल्यामुळे विशेष चर्चा रंगली. या क्षणाला भावनिक रंग चढला असून उपस्थितांमध्येही त्याची चर्चा होत होती.

अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले होते. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसंच पार्थ पवार हे राज्यसभेवर निवडून गेले. आज त्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com