Parth Pawar: आईने पदभार स्वीकारताच पार्थ पवारांना अश्रू अनावर, पाहा VIDEO

Parth Pawar Breaks Down: सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. आईने पदभार स्वीकारताच पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. यावेळी अजितदादांची खुर्ची पाहून दोघंही भावुक झाले.

सुनेत्रा पवारांनी आज उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. आईने उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी १० दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी मंत्रालयात येऊन उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारत कामकाजाला सुरूवात केली. सुनेत्रा पवार आज अजितदादांच्या कॅबिनमध्ये गेल्यानंतर भावुक झाल्या. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार या दोघांनाही अजित पवार यांची खुर्ची पाहून अश्रू अनावर झाले.

गेल्या १४ दिवसांत राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदरी देण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचीच चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com