Delhi Airport VIDEO: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 मधील छताचा काही भाग कोसळला

Delhi Airport news: दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1 मधील छताचा काही भाग कोसळला, कुठलीही मोठी दुर्घटना नाही.

दिल्ली विमानतळावर पत्र्याचा काही भाग कोसळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. टर्मिनल 1 मधील छताचा काही भाग कोसळला असून उभ्या असलेल्या एका वाहनावर खांब पडल्याची माहिती समोर येत आहे. ही दुर्घटना पहाटे ५.३० वाजता घडली आहे. या दुर्घटनेत ४ जण जखमी झाल्याची बातमी समोर येत आहे.सततच्या पावसामुळे एका ठिकाणी पाणी साचले होते, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. CISF कडून घटना स्थळी असणाऱ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं असून घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाच्या ३ गाड्या विमानतळावर पोहोचल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com